मुलाच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण करणारा अवलिया ग्रामसेवक संतोष मोरे.

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे 

भुसावळ – पावसाळा सुरू झाला की वृक्षारोपण करण्यास सांगण्यात येते मात्र मनापासून वृक्षारोपण करायचे असेल तर प्रत्येक जण वृक्षारोपण करतोच परंतु मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक गावात वृक्षारोपण करणारा ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सध्या भुसावळ पंचायत समितीच्या कुऱ्हा पानाचे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संतोष विठ्ठल मोरे हे ज्या ही गावात बदलून जातात त्या गावात दि १२ जून रोजी त्यांचा मुलगा यश यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करतात विशेष म्हणजे ट्री गार्ड व सर्व खर्च वैयक्तिक पातळीवर करतात त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे जगली आहेत. नुकताच १२ जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने कुऱ्हा पानाचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, सरपंच कविता प्रमोद उंबरकर, माजी सरपंच जिवन पाटील, रामलाल पाटील, सावकार पारधी, गौतम भाऊ व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.