पंतप्रधान म्हणून तिसर्‍या कार्यकाळात नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकर्‍यांसाठी!

पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता जारी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधानपदाची  शपथ घेतली आणि ते तिसर्‍यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. यानंतर त्यांनी अजिबात विश्रांती न घेता लगेच आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय हा देशातील शेतकर्‍यांच्या  हिताचा आहे.

नरेंद्र मोदी यांनी आज अधिकृतपणे आपल्या कार्यालयात जाऊन पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारला. यावेळी सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर मोदींनी पीएम किसान निधीचा  १७ वा हप्ता जारी केला.

लोकसभा निवडणुकीसाठी  गेले अनेक दिवस आचारसंहिता लागू झाल्यामुळे पंतप्रधान किसान निधीमार्फत जो निधी शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा होतो, तो दिला गेला नव्हता. त्यामुळे मोदींनी तिसर्‍या कार्यकाळात पहिली सही पीएम किसान निधीच्या फाईलवर केली आहे. ज्यामुळे हा निधी सगळ्या शेतकर्‍यांच्या खात्यात पोहोचणार आहे