मोदींच्या शपथविधीच्या दिवशी विमानाच्या घिरट्या बंद, कलम 144 लागू

भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रपतींनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं.

मोदींनी राष्ट्रपतींकडे एनडीएच्या घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याचं समर्थन पत्र सुपूर्द केलं. यानंतर आता मोदींच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 9 जूनला मोदींच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मोदी ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी संबंधित परिसरात विमानांना हवेत घिरट्या घेण्यास बंदी असणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मोदींच्या शपथविधीआधी नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.

एनडीएच्या नेत्यांचं दिवसभर बैठकसत्र

दरम्यान, एनडीएच्या घटकपक्षांची आज महत्त्वाची बैठक आज संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदीय नेता म्हणून निवड करण्यात आली. यानंतर संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजप नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत एनडीएच्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखासोबत बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटप आणि मंत्रिमंडळावर चर्चा झाली. एनडीएमधील हे बैठकांचं सत्र आज दिवसभर चाललं. यानंतर आता उद्या एनडीएच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे.

एनडीएकडे खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. एनडीएकडून लवकरच ते काम पूर्ण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील काही खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मचा खातेवाटपाचा फॉर्म्युला उद्या संध्याकाळपर्यंत सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला