भाजपच्या ‘या’ नेत्यांवर मंत्रिमंडळ खातेवाटपाची जबाबदारी

लोकसभा निकालानंतर आज (दि.६ जून) एनडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत सुरु आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळ खातेवाटपासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे (BJP) मुख्य नेते नरेंद्र मोदी यांनी खातेवाटपासाठी ३ नेत्यांकडे जबाबदारी दिली असल्‍याचे वृत्त ‘पुढारी न्‍यूज’ने दिले आहे.

अमित शहा, राजनाथ सिंह आणि जे. पी नड्डा या तीन नेत्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळ खातेवाटपाची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. एनडीएमधील (BJP) सर्व नेत्यांची मागणी विचारात घेवूनच खातेवाटप केले जाईल. तसेच खात्यांची अपेक्षा आणि कोणती खाती देवू शकतो, यावर पुन्हा एकदा स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.