वांजोळा शिवारात वारा वादळात झोपडी पडून दाबल्याने मजूराचा मृत्यू ?

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील वांजोळा – साकेगाव रस्त्यावर असलेल्या शेती शिवारात वारा वादळात झोपडी पडून दाबल्याने मजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने आदिवासी भिल्ल समाजाच्या गरीब कुटुंबावर संकट आले आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, किशोर देवराम सावळे रा. वांजोळा यांचे वांजोळा शिवारात गट नंबर ६२ (१ ) ( क ) या शेतात वांजोळा येथील गिरधर बजरंग भील हे शेतात झोपडी टाकून राहत होते मात्र दि,३ जून च्या रात्री अचानक वारा वादळ व पाऊस सुरू झाला असल्याकारणाने गिरधर भिल राहत असलेली झोपडी पडून दाबल्याने गिरधर भिल यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा असे बोलले जात आहे. ही घटना सकाळी ५ वाजता लक्षात आली त्यानंतर वांजोळा येथील ग्रामस्थांनी पोलीसांच्या सांगण्या नुसार गिरधर भिल यांचा मृतदेह ट्रामा सेंटर भुसावळ येथे नेला. घटनेची माहिती मिळताच शेतात नातेवाईकांनी आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळताच तलाठी खुळे मॅडम यांनी पंचनामा केला असल्याचे समजते. मयत गरीब कुटुंबातील व कमवता व्यक्ती असल्याने शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आदिवासी समाजाने केली आहे.