सुनसगावात सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान राजेंद्र ठाकरे यांचा सत्कार.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी असलेले राजेंद्र कालू ठाकरे हे भारतीय सैन्याच्या सीआरपीएफ मध्ये सेवा बजावत होते. नियमित वयोमानानुसार दि ३१ मे रोजी सेवा निवृत्त झाले त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर गावात आल्यावर गावातील पदाधिकारी व समाज तसेच गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावात ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील, पत्रकार जितेंद्र काटे, उपसरपंच एकनाथ सपकाळे, सदस्य सुनील कंकरे, युवराज पाटील, महेश भोळे, राजेंद्र ठाकरे यांची मुलगी ग्रामपंचायत सदस्य गायत्री नारखेडे, राहुल नारखेडे, कृष्णा कोळी, ज्ञानदेव कोळी, माजी पोलीस पाटील प्रकाश मालचे व ग्रामस्थांनी सत्कार केला.