नशिराबाद येथे स्व. नारायण पाटील फाउंडेशनच्या सहकार्याने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील पोलीस दलात निवड होऊन रुजू झालेले तरुण कल्पेश अहिरे (जळगाव पोलीस) सोहन माळी (बीएसएफ) धनराज कानडे, अमोल महाजन यांच्या सह त्यांचे सर्व सहकारी व स्वर्गीय नारायण पाटील फाउंडेशन यांच्या सहकार्याने स्व. माजी खासदार वाय जी महाजन सर यांच्या पुण्यस्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले

नशिराबाद सह संपूर्ण तालुक्यातील पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मार्गदर्शन व सराव व्हावा या हेतूने पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले यासाठी या सर्व तरुणांनी श्रमदानातून गावाच्या बाहेर ग्राउंड तयार केले त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या तसेच दुसऱ्या दिवशी शंभर मार्कांचा लेखी परीक्षेचा पेपर घेण्यात आला प्रशिक्षणाच्या दरम्यान उपस्थित सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना नाश्तापाणी व इतर सुविधा यांची सोय स्वर्गीय नारायण पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती तसेच या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने एक टीम वैद्यकीय सेवेसाठी तत्पर होती नशिराबाद नगरपरिषदेने देखील सुविधा पुरवण्यासाठी सहकार्य केले या शिबिरात 250 तरुण व 110 तरुणी सहभागी झाल्या होत्या प्रशिक्षणात ग्राउंड व लेखी परीक्षेत उत्तम गुण संपादन केलेल्या प्रथम दहा क्रमांकाच्या तरुणांना तर प्रथम तीन क्रमांकांच्या तरुणींना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले याप्रसंगी नशिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर महेश घायतळ नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील जितेंद्र महाजन सर, राम राठोड हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाचपांडे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नशिराबाद गावातील पोलीस दलात भरती झालेले जवान यांच्यासह यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.