उजनी बोट दुर्घटना, चाळीस तासानंतर बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडले

उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात 21 मे रोजी सायंकाळी बोट दुर्घटनेत बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. चाळीस तासांच्या शोधमोहिमेनंतर आज गुरुवारी त्यांना हे मृतदेह सापडले आहेत. यात दोन लहान मुलांसह दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यावेळी बुडालेल्या लोकांचे नातेवाईक तिथेच बसून होते. मात्र मृतदेह बाहेर काढताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.दरम्यान त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

उजनी धरण पात्रात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला होता. या वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशीहून करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट जात होती. मात्र अचानक वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बोट उलटी झाली, या बोटीमधले सहा जण बुडाले होते. यात कुगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांना पोहता येत असल्याने ते बचावले आणि त्यांनी पोहत पाण्याबाहेर येऊन ही घटना सांगितली होती. बेपत्ता लोकांमध्ये दोन लहान मुलांसह तीन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे. मंगळवार संध्याकाळपासून त्यांची शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात मंगळवारी बुडालेली प्रवासी बोट सोमवारी सापडली. जवळपास 35 फूट खोल पाण्यात ही बोट सापडली होती. मात्र 6 जण बेपत्ताच होते. अखेर आज सकाळी त्यांचे मृतदेह सापडले.

या दुर्घटनेतील गोकुळ दत्तात्रय जाधव ( 30), कोमल गोकुळ जाधव ( 25), माही गोकुळ जाधव (3), शुभम गोकुळ जाधव (18, सर्व रा. झरे ता. करमाळा) अनुराग ज्ञानदेव अवघडे (26), गौरव धनंजय डोंगरे (24) यांचा शोध लागला असून सहाही जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जळगाव : फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर तिघांकडून अत्याचार

जळगाव – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली – निवडणुकीत NDA ने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता

10 वर्षे तुरुंगवास ते १ कोटी दंड; पेपरफुटी विरोधी कायद्यात काय आहे तरतूद?

नवी दिल्ली – पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो ते करून दाखवलं

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे.