स्मोक पान’ खाल्ल्याने मुलीच्या पोटात छिद्र

बंगळुरूमध्ये लग्न समारंभात एका 12 वर्षांच्या मुलीने लिक्विड नायट्रोजनचे ‘स्मोक पान’ खाल्ले. त्यामुळे मुलीच्या पोटात छिद्र पडले. हे प्रकरण इतके गंभीर झाले की, मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना तिच्या पोटाचा मोठा भाग कापावा लागला.

बंगळुरू येथील एचएसआर लेआऊट येथील ही घटना आहे. मुलीने लग्नात स्मोक पान खाल्ले. पान खाल्ल्यानंतर मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. मुलीची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून पालकांनी तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांना मुलीच्या पोटात द्रव नायट्रोजन जास्त प्रमाणात असल्याने तिच्या पोटात 4.5 सेंमीचे छिद्र पडल्याचे दिसले. सध्या मुलीच्या जिवाला कोणताही धोका नाही.

लिक्विड नायट्रोजन थंड असल्याने त्याचे त्वचेवर गंभीर परिणाम होतात. तसेच शरीराच्या आतील भागांचे नुकसान होते.