भिख्खू संघाच्या त्यागातून बौद्ध धर्म जगात अजरामर आहे : जयसिंग वाघ 

भुसावळ :- बुद्ध काळापासून भिख्खू संघ बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आला आहे, प्रसंगी भिख्खूने आपले मरण स्वीकारले मात्र आपली निष्ठा कायम ठेवली, त्या मुळेच आज जगभरात बौद्ध धर्म अजरामर आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. पुढं आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी सांगितले की, आज भारतात बौद्ध अनुयायी संघ, कमळ, भगवा या शब्दांचा उच्चार करावयास सुध्दा घाबरतात, कोणी या शब्दांचा वापर केल्यास त्यावर टीका टिप्पणी केली जाते, बौद्ध जनतेच्या अस्मितेचे हे शब्द, प्रतीके आज बौद्ध धर्माच्या विरोधकांच्या अस्मितेचे झाले आहेत मात्र हे सर्व बौध्द धर्माची देण आहे.

२१मे रोजी भुसावळ येथील तक्षशिला नगर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करताना वाघ बोलत होते.

वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, बौद्ध धर्मात श्रामणेर वर्गाचे मोठे योगदान राहिलेले आहे गौतम बुद्ध यांचा मुलगा राहुल वयाच्या सातव्या वर्षी श्रामणेर तर विशाखा सुध्दा सातव्या वर्षी तिच्या शेकडो मैत्रिणी सोबत श्रामणेरी झाली तिच्या या कार्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला भिख्खू संघात सामील झाल्या व त्यांनी नवा इतिहास रचला मात्र अलीकडे महिलावर्ग धम्म प्रचारार्थ अत्यल्प प्रमाणात पुढं येत आहेत या बद्दल जयसिंग वाघ यांनी खंत व्यक्त केली.

सुरुवतीस श्रामणेर शिबिरात सहभागी ३६ श्रामणेरांची परिसरातून भव्य धम्म फेरी काढण्यात आली त्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुंबई येथील भंतेजी दिपंकर होते त्यांनी त्रिसरण, पंचशील घेतले, त्यांनी आशिर्वादगाथा द्वारे सर्वांना आशीर्वाद देवून मंगल कामना केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमंगल अहिरे यांनी, प्रास्ताविक प्रकाश सरदार, आभार प्रदर्शन विजय अवसरमल, स्वागत संघरत्न दामोदरे, युवराज नरवाडे, विवेक नरवाडे, परिचय रमेश सावळे, एस. पी. जोहरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन दिपरत्न तायडे, आश्र्विनी तायडे यांनी केले होते. कार्यक्रमास स्त्री – पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी