मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत

मुंबईत सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. उन्हामुळे सकाळीच नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कडक उन्हामुळे सर्वच उमेदवारांनी सकाळी लवकर मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले होते.

अनेकांना रांगेत उभे असताना उन्हाचा त्रास झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बूथ एजंटचा सोमवारी मतदान केंद्रावरच दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वरळी मतदारसंघातील मतदान केंद्रांबाहेर प्रत्येक पक्षांनी आपले पोलिंग बूथ उभारले होते. यापैकी डिलाईल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० च्या येथे म्हसकर उद्यानात ठाकरे गटाचा पोलिंग बूथ होता. या पोलिंग बूथवर मनोहर नलगे हे पोलिंग एजंट म्हणून काम करत होते. नलगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केलं. नलगे यांच्या मृत्यूनंतर ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

नलगे यांच्या मृत्यूची माहिती कळताच ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनिल शिंदे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. “मनोहर नलगे यांचा मृत्यू मतदानकेंद्रावरच झाला होता. सहा वाजायला १० मिनिटं कमी असतात नलगे टॉयलेटमध्ये गेले होते. मात्र ते परतलेच नाहीत. बॅलेट बॉक्स बंद करताना पोलिंग बूथ एजंटची स्वाक्षरी लागते. त्यावेळेस नलगेंचा शोध सुरु केला. मात्र ते टॉयलेटमध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी नलगेंना मृत घोषित केलं,” अशी माहिती सुनिल शिंदे यांनी दिली.

दुसरीकडे, आदित्य ठाकरेंनीही अनेक ठिकाणी किमान मूलभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नव्हत्या असा दावा केला होता. यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांनीही मतदानकेंद्रावर पुरेशा सोयीसुविधांचा अभाव असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रावर हव्या तशा सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. आदित्य ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

नलगे यांच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “कडवट शिवसैनिक मनोहर नलगे जी ह्याचं आज मुंबईत पोलिंग बूथवर काम करताना हृदयविकाराचा धक्का येऊन निधन झाल्याचं समजलं. डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० च्या म्हसकर उद्यानातील पुलिंग बूथवर नलगे जी पोलिंग एजन्ट म्हणून काम करत होते. ही बातमी अत्यंत धक्कादायक होती. मनोहर नलगे जीं ना भावपूर्ण श्रद्धांजली!,” असे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला