याच शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्चशिक्षण मोफत; राज्यभरातील 642 कोर्सेसचा समावेश; 20 लाख मुलींचे 1800 कोटींचे शुल्क शासन भरणार

इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल ६४२ कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी १८०० कोटी रुपयांचा भार उचलणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) होणार आहे.

इयत्ता बारावीनंतर कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार मुलींना मधूनच शाळा सोडून द्यावी लागते. दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक पालक बारावीनंतरच मुलींचा विवाह लावून देतात. त्यामुळे इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, आता त्यावर राज्य सरकारने ठोस मार्ग शोधला असून उच्चशिक्षणातील तब्बल ६४२ कोर्सेसचे शुल्क शासनातर्फेच भरले जाणार आहे.

मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढावी, उच्चशिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून बालविवाह लावून देण्याचा प्रकार थांबणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय केवळ मुलींसाठीच लागू असणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील तब्बल २० लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. हुशार असूनही आर्थिक अडचणींमुळे उच्चशिक्षण घेता येत नव्हते ही अडचण आता कायमचीच दूर होणार आहे.

शासनाच्या नवीन निर्णयानुसार

अंदाजे उच्च महाविद्यालय

५,३००

उच्चशिक्षण घेणाऱ्या मुली

२० लाख

निर्णयातील कोर्सेस

६४२

शैक्षणिक शुल्काची रक्कम

१८०० कोटी

उपसमितीचा निर्णय, आता कॅबिनेटमध्ये अंतिम मोहोर

राज्यातील उच्चशिक्षण घेणाऱ्या जवळपास २० लाख मुलींना ६४२ कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकण्याची संधी मिळणार आहे. या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते, पण आता संपूर्ण शुल्क राज्य शासनच भरणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे. आता कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय होणार असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होईल.

निकालानंतर प्रवेशावेळी फी भरावी लागणार का?

इयत्ता बारावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार असून त्यानंतर उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेण्याची लगबग सुरू होईल. अनेकदा प्रवेश घेतानाच शैक्षणिक शुल्क भरावे लागते. पण, आचारसंहितेनंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये ‘मुलींना उच्चशिक्षण मोफत’चा अंतिम निर्णय होणार असल्याने मुलींना प्रवेश देखील मोफच मिळेल हे निश्चित आहे. पण, हा निर्णय कोणत्या मुलींसाठी (जात संवर्ग) लागू असेल व त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल, यासंबंधीचा निर्णय त्या कॅबिनेटमध्येच होईल, असे सांगितले जात आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला