भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने केलं पहिलं मतदान, चाहत्यांना केलं आवाहन!

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

आज सकाळपासून मुंबईत मतदानाला सुरुवात झाली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार सकाळपासून मतदान केंद्रावर मत देण्यासाठी जाताना दिसत आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कुमार, फरहान अख्तर, सान्या मल्होत्रा, परेश रावल आणि जान्हवी कपूर यांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलं. मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या सेलेब्रिटींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षयने चाहत्यांनाही केलं आवाहन

अक्षय कुमार मतदान करण्यासाठी आला असता त्याने त्याच्या चाहत्यांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. तो म्हणाला की, “माझा भारत विकसित आणि सशक्त असावा अशी माझी इच्छा आहे आणि हे लक्षात घेऊन मतदान केलंय. तो पुढे सांगितले की, यावर्षी मतदारांचे मतदान चांगले असेल, कारण ते सकाळी 7 वाजता भेट देण्यासाठी गेले आणि त्यांच्या मतदान केंद्रावर 500-600 लोक पाहिले. नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मतदान करताना खूप बरे वाटले, असेही तो म्हणाला.