भरधाव टँकरच्या धडकेत तरुण मुलगा ठार, आई गंभीर जखमी; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव – तालुक्यातील कुसुंबा येथे बसस्थानकाच्या परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये १९ वर्षीय तरुण ठार झाला असून त्याची आई जखमी झाली आहे.

ही घटना शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अविनाश रवींद्र पाटील (वय १९, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात अविनाश पाटील हा तरुण आपल्या आई वडील यांच्या सहवास्तव्याला होता. तो फोटोशॉपीच्या दुकानात काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता अविनाश त्याच्या आईला घेऊन जळगावकडे जाण्यासाठी निघाला असता कुसुंबाच्या बसस्थानकाजवळ भरधाव येणाऱ्या टँकरने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या धडकेत अविनाश पाटील गंभीर जखमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अविनाश पाटील याला नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. अविनाश पाटील यांच्या आईला देखील मार लागला असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील कर्ता पुरुष आणि एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले

शनिवारी १८ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला