अरविंद केजरीवाल यांना CM पदावरून हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

दिल्ली – कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मार्चमध्ये अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कांत भाटी यांनी ही याचिका दाखल केली होती, ज्यांनी गेल्या महिन्यात केजरीवाल यांना पदावरून हटवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं की, या याचिकेची कोणतीही कायदेशीर योग्यता नाही.

केजरीवाल यांना गेल्या महिन्यात दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठवल्यापासून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी न्यायालयांना विनंती करणारी याचिका वारंवार येत आहेत आणि गेल्या आठवड्यात त्यांची अंतरिम जामिनावर सुटका झाल्यापासून सुरूच आहे. एप्रिलमध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं तिसऱ्यांदा – आपच्या अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या गटाची याचिका रद्द केली.