अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर करत केजरीवालांना १ जूनपर्यंत जामीन दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने आपच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी बळ मिळण्यास मदत होणार आहे.