चार वाहनांच्या विचित्र अपघातात तरुण ठार !

एरंडोलयेथे म्हसावद रस्त्यावर श्री कृपा जिनिंग जवळ ईरटीका ट्रक ॲपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांचा चित्र अपघात होऊन दुचाकीस्वार राम कृष्ण भागवत पाटील मुळगाव सामनेर हल्ली मुक्काम ठाकरे कॉलनी पाचोरा हा युवक जागीच ठार झाला.

ही दुर्घटना रविवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,

(आर जे 10 जीबी 8528) क्रमांकाचा ट्रक एरंडोल कडून म्हसावद कडे जात असताना सदर ट्रकला (एमएच, डीक्यू 8174) क्रमांकाची मोटर सायकल जात असताना ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या म्हसवादकडून एरंडोलकडे (एमएच १९ व्ही १२६७) क्रमांकाच्या रिक्षाला (एम एच 18 बीसी 1408) ईरटीका या वाहनाने ओव्हरटेक करताना दोघेही ओव्हरटेक करत असताना समरासमोर वाहनांची धडक होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील रा. पाचोरा हा युवक जागीच गतप्राण झाला. मयत तरुण हा कुटुंबातील एकुलता एक होता. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.