नाशिक हळहळले: सप्तशृंगी गडाच्या दरीत उडी घेऊन प्रेमीयुगलानी जीवन संपविले

नाशिक – वणी गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फूट खोल दरीत उडी घेऊन तरुण व अल्पवयीन मुलीने जीवन संपविले. ही घटना दि. २८ एप्रिलरोजी घडली. मंगेश राजाराम शिंदे (वय २४, रा. भायाळे, ता. चांदवड जि. नाशिक) व प्रियंका संतोष तिडके (वय १६, रा. वडनेरभैरव, ता. चांदवड, जि. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. Nashik crime news

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगेश आणि प्रियंका मोटर सायकलवरून (MH-15-HJ-5915) वडनेरभैरव येथून २८ एप्रिलरोजी सप्तश्रृंगी गडावर आले होते. या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे जाऊन सुमारे चारशे ते पाचशे फूट खोल दरीत उडी घेवून जीवन संपविले. त्यानंतर मुलीचा मृतदेह झाडाला अडकलेला होता. तर तरुणाचा मृतदेह दरीत आढळून आला. Nashik crime news

घटना होऊन ६ दिवस झाल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती गुराख्यांनी भातोडेचे (ता. दिंडोरी) पोलीस पाटील विजय चव्हाण यांना दिली. त्यानंतर वणी पोलिसांत खबर देण्यात आली. वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड दरीत उतरून मृतदेहाचा पंचनामा केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. मृत दोघांचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh