मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अनोखी शक्कल !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – मतदानाचे महत्त्व काय आहे हे अजूनही अनेकांना पटलेले नाही. मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस अस समजून लोक मतदानाचा हक्क बजावत नाही यासाठी आता नविन शक्कल लढविण्यात आली असून आता ज्या गावाचा मतदान टक्का वाढणार आहे त्या गावांना ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यासाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य फलक मिळणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या सुचनेनुसार मतदानाच्या मतदारांसाठी क्षेत्रिय स्पर्धा राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने १३ मे २०२४ रोजी मतदान केंद्र निहाय मतदान टक्केवारी नुसार ७६ ते ८५ टक्के कांस्य फलक, ८६ ते ९० टक्के रौप्य फलक आणि ९० ते १०० टक्के सुवर्ण फलक लावण्यात येणार आहे. सदर फलकांच्या माध्यमातून लोकशाही सहभागाला चिरस्थायी प्रतिक म्हणून बघितले जाईल असे आवाहन केले आहे. या बाबत जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना गट विकास अधिकारी कार्यालय पंचायत समितीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. आता किती सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व पदाधिकारी या आवाहनाला प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh