गुरुजींना वर्षभरात १२८ सुट्या, वेळापत्रक जाहीर: नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू

आगामी शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले. त्यानुसार दोन मेपासून शाळांना उन्हाळी सुटी असून, १५ जूनला नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होईल.

सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या गुरुजींना पुढच्या सत्रात तब्बल १२८ दिवस हक्काच्या सुट्या मिळणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जारी केला.

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे वेळापत्रक तयार केले. त्यास सीईओ विकास मीना यांनी मंजुरी दिली. यात दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान असतील. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीमुळे सुटी असेल.

त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असल्याचेही वेळापत्रकात स्पष्ट केले आहे. शिवाय शासनाने निर्धारित केलेल्या २० सुट्या, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ आणि मुख्याध्यापक स्तरावरील २ सुट्याही असतील. ज्या शाळांना गणेशोत्सव, नाताळ, रमजान, मोहरम सारख्या सणांना सुट्या घ्यायच्या असतील, त्यांनी दिवाळीची सुटी कमी करून त्याऐवजी इतर सणांच्या तेवढ्याच कालावधीची सुटी समायोजनाने शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने जाहीर करावी.

नागपंचमी, पोळा, राजमाता जिजाऊ जयंती आदीप्रसंगी स्थानिक मागणीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने मुख्याध्यापक अधिकारातील सुटी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे. शहरासह जिल्ह्यातील सीबीएसईच्या शाळांनाही हेच वेळापत्रक लागू असणार असल्याचे शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी कळवले आहे.

कोणत्या महिन्यात किती?

मे २९

जून १७

जुलै ५

ऑगस्ट ६

सप्टेंबर ८

ऑक्टोबर १०

नोव्हेंबर १३

डिसेंबर ६

जानेवारी ४

फेब्रुवारी ६

मार्च ७

एप्रिल ७

असे आहे गणित

शिक्षकांना तब्बल ७६ सुट्या मिळणार आहेत. त्यात २० सार्वजनिक सुट्या, १० दिवस दिवाळी सुट्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील ३ सुट्या, ४० दिवसांच्या उन्हाळी सुट्या व मुख्याध्यापकांच्या अधिकारातील ३ सुट्यांचा समावेश आहे. या शिवाय या सत्रात रविवारच्या ५२ सुट्या मिळणार आहेत. अशा एकंदर १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम