महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

मुंबई – 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे.

हेच औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयुष्यात पहिलं रिल केलं आहे. यामाध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांचं हे रिल सोशल मीडियावर हे रिल तुफान व्हायरल होत आहे.

राज ठाकरे यांनी रिल स्टार अथर्व सुदामेसोबत महाराष्ट्र दिनानिमित्त खास व्हिडीओ बनवला आहे. या रिलमधून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाचं महत्व सांगितलं आणि मराठी भाषा संवर्धनाविषयी भाष्य केलं. रिलमध्ये सुरुवातीला अथर्व सुदामे भाषणाची तयारी करताना दिसून येत आहे. यात राज ठाकरे यांची एन्ट्री होते आणि दोघांमध्ये महाराष्ट्र आणि मराठी भाषा यावर संवाद होते. रीलमध्ये अथर्व म्हणतो आहे, ‘1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. निर्मिती झाली, ती सीमा आखून दिलेल्या राज्याची नाही तर संस्कृतीची.. ज्ञानोबा, तुकाराम, छत्रपती यांनी खरंतर महाराष्ट्र घडवला’.

राज ठाकरे यांची व्हिडीओमध्ये एन्ट्री होते आणि ते अथर्वला विचारतात, ‘काय अथर्व कधी आलास, काय चाललंय?’. त्यावर अथर्व उत्तर देतो, ‘1 मे निमित्त जरा छोटंस भाषण आहे. ते जरा पाठ करण्याचा प्रयत्न करतोय’. यावर राज ठाकरे म्हणतात, ‘भाषण पाठ करतोय..बघू… संयुक्त महाराष्ट्र, टिळक, शाहू, फुले, आंबेडकर, सावरकर, पु.ल.देशपांडे, मंगेशकर, बाळासाहेब, तेंडुलकर व्हा छान उल्लेख आहेत. इतिहास, संस्कृती याबद्दल उत्तम लिहिलं आहेस’, असं म्हणत त्याचं कौतुक करतात. यावर अथर्व त्यांना ‘साहेब यात काही बदल” असं विचारतो.

https://www.instagram.com/reel/C6YrSprItr3/?igsh=eHBxYXVydWJ0Y2l6

राज ठाकरे म्हणतात, ‘बदल काही नाही.. उत्तम आहे हे…परंतु आपण आज काय करतोय ना ते देखील सांगणं गरजेचं आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कतृत्व गाजवलं, महाराष्ट्र मोठा केला. आज आपण असं काय करणार आहोत, ज्यामुळे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल. मला असं वाटतं त्याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषेत आपण बोललं पाहिजे. समोरचा पटकन हिंदीत बोलल्यावर आपण गरंगळत जाऊन हिंदी बोलतो. त्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही’.

यावर अथर्व म्हणतो, ‘खरं आहे साहेब… ससा तो ससा की कापूस जसा हे शिकलं पाहिजे. बहात्तर आणि अठेचाळीस म्हणता आणि वापरता आलं पाहिजे. कारण आपण येत नाही म्हणून वापरत नाही. वापरत नाही तर गरज नाही असं वाटतं’. यावर राज ठाकरे म्हणतात, ‘हा अभिमान आणि स्वाभिमान टिकवणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला छोटासा खारीचा वाटा देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तु जे चांगलं काम करतो आहेस. चांगले करतो आहेस. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत’. राज ठाकरेंनी अथर्वला शुभेच्छा दिल्यानंतर बॅकग्राऊंडला ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं वाजतं. सध्या हे रिल चांगलचं चर्चेत आलं आहे

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला