साकेगाव येथील बालकाचे अपहरण प्रकरणी पाच संशयीतांना अटक ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील अवघ्या आठ महिन्याच्या बालकाचे अज्ञाताकडून अपहरण करण्यात आले होते या घटनेचा तपास पोलीस करीत होते शेवटी पोलीसांना बाळ व अपहरण कर्ते शोधण्यात यश आल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले जात आहे.

दि.२३ एप्रिल २४ रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास झोक्यात झोपलेल्या अरविंद अर्जुन भील या बालकाचे साकेगाव येथून अपहरण करण्यात आले होते या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना माहिती मिळताच भुसावळ येथील नारायण नगर, मोरया हाॅल च्या मागे शिवपूर कन्हाळा रोड येथील अलका जीवन स्पर्श फाऊंडेशन या संस्थेच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला अपहरण करण्यात आलेले बालक या ठिकाणी सापडले असून या बालकाचा साकेगाव येथील त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी दिपक रमेश परदेशी नारायण नगर भुसावळ, अमित नारायण परिहार नागसेन काॅलनी कंडारी भुसावळ, कुणाल बाळू वाघ शिंगारबर्डी साकेगाव, बाळू पांडुरंग इंगळे आॅर्डनन्स फॅक्टरी वरणगाव आणि रिना राजेंद्र कदम नारायण नगर भुसावळ अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे .आणखी एक आरोपी फरार असून दोन अल्पवयीन बालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यातील अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध अनेक प्रकारचे गुन्हे असून एक आरोपी नंदुरबार जिल्हा येथे पोलीस असल्याची माहिती आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप, एपीआय विशाल पाटील, सफौ विठ्ठल फुसे, पोहेकाॅ युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, दिपक जाधव, वाल्मिक सोनवणे, उमेश बारी, राईटर संजय तायडे, राहुल महाजन, सफौ सादिक शेख, दिलीप जाधव, संजय भोई, जगदीश भोई, महिला पोलीस छाया पाटील, पोना नितीन चौधरी, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, राहुल भोई , अमर आढाळे व पोऊनि वाघमारे यांनी या पथकात सहभागी होऊन एका बालकाची भेट घडवून आणली आहे. या कामगीरी मुळे भुसावळ तालुका व बाजार पेठ पोलीसांचे कौतुक केले जात आहे.