School News : उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना गैरहजर राहण्याची सवलत; राज्य सरकारचे सर्व शाळांना निर्देश

राज्यात उन्हाचा तडाखा मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. उष्णतेमुळे अनेकांना उष्माघाताच्या समस्या देखील उद्भवत आहेत. एवढ्या कडक उन्हाळ्यात अनेक विद्यार्थ्यांच्या शाळा दुपारच्या सत्रात असतात.

विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊनये यामुळे राज्य सरकारने सर्व शाळांना विद्द्यार्थ्यांना शाळेत गैरहजर राहण्याची सवलत देण्याचे निर्देष दिले आहेत

राज्य सरकारने राज्यातील सर्व शिक्षण संचालकांना उन्हामुळे मुलांना शाळा बंधनकारक करू नका, असे निर्देश दिले आहेत. राज्यात मराठवाडा, विदर्भ या जिल्ह्यांत तापमानाचा पार प्रचंड वाढला आहे. आतापर्यंत येथे ४१ अंशाहून अधिक तापमानाची नोंद झालीये. विद्यार्थ्यांना उन्हामुळे भोवळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुट्टी घेताना किंवा गैरहजर राहताना विद्यार्थ्यांना सवलत द्यावी असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण संचालकांना याबाबत सूचन दिल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळासह इतर बोर्डाच्या शाळांनाही याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे.

पत्रातील मुद्दे

१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याथ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.

२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राविण्यात येत असल्यास, विद्याध्यांना उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

jalgaonsandesh

jalgaonsandesh