प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे एपीआय विशाल पाटील यांच्या कडे जामनेर रोड वर पिस्टल चा धाक दाखवून जबरी रस्ता लूट चा तपास होता. या रस्ता लूट मध्ये जामनेर च्या व्यापाऱ्याची ११ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. यावेळी दोन तीन पथके तपासासाठी नेमण्यात आली होती. यातील एका पथकाने आरोपींना शोधून आरोपींकडून १० लाख ६० हजार रुपये व पिस्टल असे जप्त केले होते. याकामी बाजार पेठ, उप अधीक्षक, तालुका पोलीस स्टेशन असे कर्मचारी पथके तपासासाठी फिरत होते ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू होती.
तसेच भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे व तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप यांचे मार्गदर्शन घेत अखेर आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. लवकरात लवकर या जबरी चोरीचा तपास केल्याने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे एपीआय विशाल पाटील यांचा सन्मान जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी केला. या बद्दल विशाल पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.