मुंबई – शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा 2021 साली पॉर्नोग्राफी प्रकरणात चर्चेत आला होता. त्याला अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा आता ईडीच्या कचाट्यात सापडला आहे.
राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. ईडीकडून राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीनं राज कुंद्राची जी संपत्ती जप्त केली आहे त्यात शिल्पा शेट्टीचा जुहू येथील बंगला देखील आहे.
ही संपूर्ण कारवाई प्रिवेंशन ऑफ मनी लाँन्ड्रिंग एक्ट PMLA2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं बिटकॉइन पॉन्जी स्कॅम प्रकरणात राज कुंद्रावर ही कारवाई केली आहे. राज कुंद्राच्या जप्त केलेल्या संपत्तीमध्ये त्याचा पुण्यातील बंगला आणि काही इक्विटी शेअर्स आहेत.
महाराष्ट्रात नोंदवल्या गेलेल्या वेगवेगळ्या FIRच्या आधारे PMLA कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. मेसर्स व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड, दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतर एमएलएम एजंट्सनी खोटी आश्वासनं देऊन गुंतवणूकदारांकडून 6600 कोटी रुपयांचे बिटकॉइन मिळविल्याचा आरोप होता. 2017 हे पैसे 10 टक्के रिटर्सनी वसूल होतील अशी खात्री देण्यात आली होती..