‘शाळांना सुट्टी जाहीर करा!’ राज ठाकरेंचं सरकारला पत्र

आचारसंहितेच्या काळात तातडीने निर्णय घेण्याची का केली विनंती?

मुंबई : उन्हाळ्याचे दिवस  म्हटले की शाळांना सुट्ट्या सुरु होतात. राज्यात काही शाळांच्या परीक्षा आटोपून सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. मात्र, काही शाळा अद्याप सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यंदा वेळेआधीच वातावरणात प्रचंड उकाडा भासत आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाच्या इतक्या झळा बसत आहेत की मे महिन्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. शाळेत जाणार्‍या मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो आहे. तसंच आरोग्याच्या समस्याही  जाणवत आहेत. त्यामुळे सुट्टी सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी शाळांना लवकर सुट्टी जाहीर करण्याची विनंती करणारं पत्र राज्य सरकारला लिहिलं आहे.

राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे की,

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.

मनसैनिकांना विनंती

माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा.

आपला नम्र,

राज ठाकरे.

राज ठाकरेंनी ही विनंती पत्र लिहून केली आहे. आता या मागणीचा सरकार विचार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं