बावनकुळे यांचं वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेसला दिली रावणाची उपमा, म्हणे त्यांचा अंत करा

प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज वादग्रस्त चंद्रपुरात बेताल वक्तव्य केलं. ज्या प्रमाणे हातात धनुष्यबाण घेऊन रावणाचा वध केला त्याच प्रमाणे काँग्रेसरुपी रावणाचा अंत करा असे आव्हान बावणकुळे यांनी केले आहे.

या वकत्व्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे व मंत्री छगन भुजबळ हे चंद्रपूर वणी आर्णीतील उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेसाठी मूल येथे आले होते.