१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच १०वीचा निकाल जाहीर करणार आहे.

संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. २०२४ महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख, वेळ आणि गुणपत्रक कसे पहावे.

‘या’ तारखेला जाहीर होऊ शकतात निकाल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२ वी २०१४ चा निकाल में २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदलही होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२४ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल. महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्याअगोदर दहावीचा निकाल लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १, २ आणि ३ जून यापैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.