ममुराबाद येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी !

जळगाव – तालुक्यातील ममुराबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच सौ कल्पना विलास शिंदे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, शैलेंद्र पाटील, संतोष कोळी, गावातील नागरीक दत्तु सोनवणे, अनंत चौधरी, राजेंद्र शिंदे, सा जळगाव संदेशचे संपादक महेंद्र सोनवणे, ग्रामपंचायत कमचारी ज्ञानेश्वर सावळे, दिलीप सावळे, राजरत्न साळुंके, महेश अत्तरदे, नितीन देवरे, यांनी पुजन केले.

त्याचप्रमाणे आंबेडकर नगरमध्ये असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करूण पुजन करण्यात आले,

यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी तसेच गावातील नागरीक परिसरातील बहुसंख्य दलित बांधव व दलित महिला तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते,

तसेच ममुराबाद नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी तुळाशीराम कोळी, अनिल चौधरी, भगवान सोनवणे, भगवान पाटील, चंद्रकांत पाटील, गोपाल पाटील, जावेद पटेल, तसेच सदस्यांनी व पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याला हार घालुन पूजन केले. सालाबादप्रमाणे नियमितपणे मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh