भरधाव आयशरच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी

जळगाव – तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिल्याने ६२ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ६ एप्रिल रोजी सकाळी घडला आहे.

तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. रविंद्र प्रभाकर चौधरी वय -६२ रा. पाडळसे ता. भुसावळ असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील पाडळसे येथे रविंद्र चौधरी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. ते जळगव येथील राजू राणे यांच्या एलपीजी पेट्रोल पंपावर कामावर होते. दरम्यान, नेहमीप्रमाणे शनिवारी ६ एप्रिल रोजी सकाळी त्यांचे सहकारी विनोद दामू तळेले वय ४७ रा. भुसावळ यांच्या सोबत दुचाकीने जळगावला कामावर येण्यासाठी निघाले. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास नशिराबाद टोलनाक्याजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले रविंद्र चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांचा मृत्यू झाला तर विनोद तळेले हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, मृतदेह तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.