जळगाव – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (ता. ५) जळगाव विमानतळावर उतरून मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनाने धुळ्याकडे रवाना झाले. साक्री येथील अपक्ष आमदार मंजुळा गावित यांच्या मुलाचे धुळे येथे लग्न होते.
त्याला उपस्थिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने मुंबई येथून विमानाने आले.
धुळे विमानतळावर नाईट लॅडिंगची सुविधा नसल्याने ते जळगाव विमानतळावर उतरले. येथून धुळे येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या खासगी मोटारीने रवाना झाले. आचारसंहिता असल्याने त्यांना खासगी मोटारीने जावे लागले. रस्त्याने जाताना पारोळा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.