भरधाव  वाहनाच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; नातेवाईकांचा रूग्णालयात आक्रोश

जळगाव – एमआयडीसीतील रेमंड चौकाजवळ भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत कसुंबा येथील दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरूवार ४ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घडली आहे.

घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव दलपत सपकाळे वय २२ रा. तुळजाई नगर, कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील तुळजाई नगरात प्रवण सपकाळे हा तरूण आई वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. शहरातील बॅनर लावण्याचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दुचाकीने जळगावकडून कुसुंबा येथे जाण्यासाठी गुरूवार ४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता दुचाकीने निघाला होता. एमआयडीसीतील रेमंड चौकाजवळून जात असतांना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची वार्ता कळताच आई वडील आणि बहिण यांनी एक आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई प्रिया, वडील दलपत वसंत सपकाळे आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

ताजा खबरें