केजरीवाल यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने धक्का दिला आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. कोर्टाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ईडीची ही मागणी कोर्टाने मंजूर केली आहे.