प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वेल्हाळे येथील शेतकरी विज रोहित्र नादुरुस्त झाल्याने पिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा करता येत नसल्याने शेतकरी हंगामात पासून वंचित राहणार असून या नुकसान भरपाई ला वीजवितरण कंपनी जबाबदार धरली जावी असे वेल्हाळे येथील शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
गेल्या २ मार्च पासून वेल्हाळे शेती शिवारातील रोहित्र (डि प) छगन 4612331 ही काहीना काही कारणाने बंद पडत आहे. डि ओ जाणे, एक फेज नसणे असा प्रकार दररोज घडत आहे. या छगन डिपी बाबत अनेक शेतकऱ्यांनी आज पर्यंत तक्रारी केल्या आहेत मात्र पाहिजे तशी दखल घेतली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. तरी लवकरात लवकर छगन डिपी दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आ. संजय सावकारे यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली जात आहे.