अजित पवार गटाला धक्का! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव नॉट रिचेबल

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळाचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे नॉट रिचेबल झाले आहेत.

गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास दिंडोरीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. गोकुळ झिरवाळ हे नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव आहेत. शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांनी दिंडोरीतून उमेदवारी मागितली. ते लवकरच शरद पवारांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. मात्र गोकुळ झिरवाळ सध्या नॉट रिचेबल आहेत.