खदखद फेम कराळे मास्तरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, सोशल मीडिया स्टारला उमेदवारी मिळणार का?

मुंबई – सोशल मीडियातून स्टार बनलेले मास्तर म्हणजेच नितेश कराळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी (दि.30) लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असतानाच कराळे मास्तरांनी आज (दि.29) पक्षप्रवेश केला. त्यामुळे त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रवेशानंतर काय म्हणाले नितेश कराळे ?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नितेश कराळे म्हणाले,” मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्वर ओक येथे प्रवेश घेतला. लवकरच मी माझी भूमिका आणि फेसबुक,इंस्टाग्राम, youtube, ट्विटर व प्रसार माध्यमाढून वरून जाहीर करील.

मोदी सरकार पाडण्यासाठी लढले पाहिजे

पुढे बोलताना नितेश कराळे म्हणाले, पवार साहेब व जयंत पाटील साहेब यांच्या प्रचंड आग्रहास्तव त्यांच्या विनंतीला मान देऊन पुढील वाटचालीची सविस्तर चर्चा करून हा प्रवेश घेण्यात आला आहे. केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार पाडण्यासाठी आपण एकजुटीने लढले पाहिजे. या भूमिकेतून हा निर्णय मी घेतला आहे. सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो आतापर्यंत विश्वास दाखवला आहे.तो विश्वास यानंतरही मी कायम ठेवेल आणि यानंतरही मी माझी कणखर भूमिका युट्युब, फेसबुक, आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून मांडत राहील.हे मा.पवार साहेबांशी बोलूनच मी माझा प्रवेश पक्षात घेतला.