जिल्हा परिषदेच्या आवारात होत असलेल्या पेव्हर ब्लॉकचे काम बोगस ! बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

जळगाव – : सध्या जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असून या कामात मोठा भ्रष्टचार सुरू असल्याची ओरड सुरू आहे. याबाबत जि प च्या काही जबाबदार अधिकाऱ्यांना या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी मात्र आम्हाला काहिच माहित नाही असे म्हणुन हात वर केले आहे.

पेव्हर ब्लॉक बसवण्याचे हे काम ठेकेदाराच्या नावावर एक पदाधिकारी करीत असल्याने सर्व आलबेल सुरू असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू असून हे काम प्राकलणानुसार होत नसल्याचे दिसून येत आहे.

प्राकलनानुसार ब्लॉक ठेवण्या आधी त्याखाली दगळी कच मोठ्या प्रमाणात टाकणे आवश्यक असताना एकदम कमी प्रमाणात कच टाकुन त्यावर ब्लॉक बसवण्यात येत आहे.

या कामावर जि प चे चे नियंत्रण आहे.परंतु ह्या कामावरून वापरतांना बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे बंद करून ये जा करीत आहे. जिल्ह्याच्या मोठ्या कार्यालय परिसरात असे बोगस काम होत असल्याने शासन व्यवस्था हतबल ठरली आहे.या कामात खुलेआम नित्कृष्ठ दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याने दर्जा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

ग्रामपंचायतीच्या किंवा इतर कोणत्या निधीत एखाद्या ठेकेदाराने कितीही चांगल्या दर्जाचे काम केले तरी जि प चे बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी खुप मोठ्या प्रमाणात त्या ठेकेदाराच्या केलेल्या कामात काही चहापाणी मिळावी या उद्देशाने त्रुटी काढतात शेवटी ठेकेदार हतबल होऊन त्या भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना शरन जातो आणी चहापाणी देऊन आपले काम धकवतो.

मग अधिकाऱ्यांच्याच कार्यालयाच्या कामावर नियंत्रन कोणाचे असा प्रश्न ठेकेदारांना व नागरीकांना पडत आहे.

या पेव्हर ब्लॉकचे काम करणाऱ्या ठेकेदारावर त्याचप्रमाणे कामावर नियत्रंण असलेल्या अधिकाऱ्यांनवर जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे कारवाई करतील का अशी चर्चा काहि बांधकाम ठेकेदारांकडून केली जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh