अमेरिकेत बाल्टीमोर येथे जहाजाच्या धडकेने पूल कोसळला, अनेक गाड्या पाण्यात पडल्या

अमेरीकेतील बाल्टीमोर शहरात एक मोठा अपघात घडला आहे. कंटेनर जहाजाची पूलाला धडक लागून जहाजाच्या धडकेने एक मोठा पूल कोसळला आहे. या भयंकर अपघाताने पूलावरील अनेक गाड्या पाण्यात पडल्या. बचावकार्य पाण्यात पडलेल्या सात लोकांचा शोध घेत आहे.

सोशल मीडीया साईट एक्सवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फ्रान्सिस स्कॉट जहाज एका पूलाला टक्कर देतं. ज्यामध्ये तो पूल अनेक ठिकाणी कोसळला आहे. या धडकेने जहाजाला आग लागली आणि जहाज पाण्यात बुडताना दिसत आहे. बाल्टीमोर अग्निशमन विभागाच्या संवाद संचालक केविन कार्टराईट याने माध्यमांना सांगितले की, ही एक गंभीर समस्या आहे. सध्या लोकांचा बचाव करण्याकडे आमचे लक्ष्य आहे, व्हिडिओ पाहिल्यावर काही सामान पुलावरुन लटकत असल्यासारखे दिसत आहे