भारतीय बौद्ध महासभेची बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा उत्साहात संपन्न

जळगाव – जळगांव जिल्हा पूर्व शाखा अंतर्गत तालुका शाखा यांनी राबवलेल्या श्रामनेर शिबिरातील श्रामनेर शिबिरार्थी यांची सालाबादप्रमाणे बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा रविवार दिनांक२४ मार्च२०२४ रोजी जळगाव येथील संस्थेचे “यशवंत भवन” वाघ नगर, जळगाव येथे केंद्रीय प्रशिक्षण विभाग यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. या परीक्षेला जिल्हातून मोठया प्रमाणात श्रामनेर झालेले कार्यकर्ते उपस्थित होते.  सदर परीक्षेसाठी मुख्य परीक्षक म्हणून, महाराष्ट्र राज्याचे संस्कार उपाध्यक्ष. यु. जी. बोराडे गुरुजी मुंबई. उपमुख्य परिक्षक, सुनंदाताई तेलगोटे अकोला. परीक्षक, युवराजजी नरवाडे गुरूजी,ए.टि. सुरडकर गुरूजी यांनी परीक्षेचे कामकाज पाहिले. परीक्षेकरिता एकूण १६ परिक्षार्थीची उपस्थिती होती. नियोजनाप्रमाणे प्रथम सत्रात आदर्शांचे प्रतिमा पूजन करून, त्रिशरण पंचशील घेऊन, परीक्षेचे उद्घाटन करण्यात आले. परीक्षेकरिता लाभलेल्या परीक्षकांचा जिल्हा शाखेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.त्यानंतर लेखी परीक्षा झाली. नंतर उपस्थित सर्वांना भोजन देण्यात आले. दुसऱ्या सत्रात तोंडी परीक्षा घेऊन, परीक्षार्थींना ए.टि. सुरडकर गुरुजी, युवराजजी नरवाडे गुरुजी, सुनंदाताई तेलगोटे, यु .जी.बोराडे गुरूजी, जिल्हाध्यक्ष रवींद्र वानखेडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.

परीक्षेचे मुख्य व्यवस्थापक म्हणून जिल्हाध्यक्ष आद. रवींद्र वानखेडे गुरुजी यांनी सर्व व्यवस्था पाहिली. सदर परीक्षेकरिता जिल्हा पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्षा प्रियंकाताई अहिरे, जिल्हाउपाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, संस्कार उपाध्यक्ष बी. एस. पवार गुरुजी, उपाध्यक्ष संरक्षण रमेशजी सावळे , कार्यालयीन सचिव सुभाषजी सपकाळे, तर तालुका पदाधिकारी जळगाव तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, भुसावळ तालुकाध्यक्ष उत्तम सुरवाडे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, रावेर सरचिटणीस संघरत्न दामोदरे, बोदवड सरचिटणीस प्रमोद सुरवाडे, जामनेर उपाध्यक्ष माणिक लोखंडे, भुसावळ उपाध्यक्ष आनंद सपकाळे, प्रवीण डांगे, जळगाव उपाध्यक्ष जगदीश सपकाळे, कोषाध्यक्ष यशवंत जाधव आदी, पदाधिकारी हजर होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव गुरुजी यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले. सरणंत्तयंनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh