प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथे आ. संजयभाऊ सावकारे यांच्या निधीतून सन २०२२- २३ मध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम झाले होते. विशेष म्हणजे या सभागृहाला दि.९ आॅगष्ट २०१६ रोजी विशाखापट्टणम येथे शहिद झालेल्या शहिद जवान शांतीलाल किसन जंगले सभागृह असे नाव देण्यात आले आहे.
मात्र या सभागृहाला ठिकठिकाणी भिंती ला तडे गेल्याने सभागृह पडण्याच्या मार्गावर आहे तरी आमदारांनी संबंधित ठेकेदाराला सांगून सभागृहाचे काम करायला सांगावे असे वराडसिम गावातील ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे.