भुसावळ – भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व ची भुसावळ व याचल येथे नवीन तालुका आणि शहर कार्यकारणी ची निवडीबाबत महत्वाची बैठक गुरुवार 21/03/24 रोजी जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे. असे जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
सदर बैठक भुसावळ येथील दुपारी 12 वाजता शील रत्न बुद्ध विहार, चांदमारी चाळ, येथे होणार आहे. तर यावल तालुक्यातील फैजपूर येथील सम्राट बुद्ध विहार, आंबेडकर नगर, येथे होणार आहे. या बैठकीला जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बोद्धचार्य, तालुक्यातील पदाधिकारी, बौद्ध उपासक व उपासिका यांनी उपस्थित राहावे असे आव्हान वैशाली सरदार यांनी केले आहे.