अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात दाखल केले आहे.

भास्कर डॉट.कॉमच्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागले, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमिताभ बच्चन यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी केली असून त्यांनी शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडिया एक्सवरुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.

ताजा खबरें