शेळगाव बॅरेजजवळ वाळू उत्खनन करतांना जे.सी.बी.सह डंपर पकडले

जळगाव – यावल तहसीलदार यांच्या पथकाने मंगळवारी रात्री शेळगाव बॅरेज जवळ बेकायदा अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू असतांना एक जेसीबी व वाळू वाहतूक करतांना एक डंपर पकडले. रात्रीच्या अंधारात तापी नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली.

घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्ही वाहने यावल तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. यावल तालुक्याच्या हद्दीत तापी नदीवरील शेळगाव बॅरेजच्या पश्चिमेला तापी नदीपात्रातून विनापरवाना जेसीबीव्दारे अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री तहसीलदार मोहनमाला नाझीरकरसह मंडळ अधिकारी सचिन जगताप, मंडळाधिकारी बबिता चौधरी, मंडळाधिकारी एम.एच.तडवी, मंडळ अधिकारी किनगाव एस.एल.पाटील, तलाठी ईश्वर कोळी, तलाठी वसीम तडवी, तलाठी मिलिंद कुरकुरेंसह पथकाने विना क्रमांकाच्या जेसीबी ताब्यात घेतले तर अज्ञात चालक जागेवर जेसीबी सोडून पसार झाला. यावेळी वाळू भरून डंपर (क्रमांक एम.एच.19 झेड.3944) हे नदीतून जात असताना त्यास पकडण्यात आले. विकास पांडुरंग लोहार (भुसावळ) यांच्या मालकिचे हे डंपर आहे. पंचनामा करून दोनही वाहन यावल तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. या कारवाईमुळे अवैद्यरीत्या गौण खनिज उत्खनन करणार्‍यांसह वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh