जळगाव – भारतीय जनता पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू असून शहरातील गणेश कॉलनीतील शिक्षक संदिप भागवत घुगे यांची भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली. हि निवड भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश कार्यकारणी बेठकीत आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यानी नियुक्ती पत्र देवून केली.
संदिप घुगे अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय सदस्य म्हणून काम करीत आहे. भटक्या विमुक्तच्या लोंकाच्या अडि- अडचणी सोडविणार व शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.
या निवडी बद्दल संदीप घुगे यांचे ना.गिरीश महाजन, आम.राजू मामा भोळे, खा.उन्मेश पाटील, खा.रक्षा खडसे, जळकेकर महाराज, स्मिता वाघ, चेंद्रशेखर अत्तरदे, उज्वला बेंडाळे, राजेंद्र घुगे, भूषण लाडवंजारी, अनिल जोशी, भानुदास जोशी, नरेश बागडे यांनी अभिनंदन केले.