प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे फायटर कोंबड्यांची झुंज लावून सट्टा खेळला जात होता. हा प्रकार माहीत होताच पोलीसांनी धाड टाकून ११ जणांना अटक केली होती. व अंदाजे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तसेच ज्या कोंबड्यांची झुंज लावली जात होती.
त्या कोंबड्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले होते मात्र पोलिस स्टेशनमध्ये कोंबड्यांची खाण्यापिण्याची सोय होणार नाही म्हणून या कोंबड्यांचा लिलाव करण्यात आला. ही दोन्ही कोंबडे दोन हजार रुपयात विकले गेल्याचे सांगितले.