अभिनेत्री क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार नोंद

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री कांती रेडेकरला पाकिस्तानून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. क्रांतीला पाकिस्तानी क्रमांकावरून अश्लील संदेश पाठवत जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

या धमकीनंतर क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस ठाणे गाठत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंद केलीआहे.

क्रांती रेडकरला ६ मार्चला व्हॉट्सअॅपवरून अश्लील भाषेत वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून धमकी मिळाली. त्यानंतर क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंद केली. तिने ब्रिटन आणि पाकिस्तानी क्रमांकावरून धमकी मिळाली आहे.

क्रांती रेडकरला या आधी देखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये क्रांतीला धमकी मिळाली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी मिळाली होती. तेव्हा क्रांती रेडकरने तिच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती.

क्रांती रेडकर प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्रांती रेडकर अभिनयासोबत दिग्दर्शक देखील आहे. क्रांतीने ‘सून आस्वी आशि’ मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. क्रांती रेडकला जुळ्या मुली आहेत.

दरम्यान, क्रांती रेडकरचे पती एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे दोन वर्षापूर्वी प्रचंड होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स क्रुझ प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर चर्चेत आले होते.