जळगाव – जिल्हा पोलिस विभागातर्फे ८ मार्च रोजी असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत रामानंद नगर पोलीस स्टेशनचे डीबीचे कर्मचारी संजय सपकाळे यांच्या पत्नी ममता संजय सपकाळे यांनी 3 किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते ममता सपकाळे हिला मेडल आणी प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.हाजी इकबाल मिर्झा, नितीन पाटील, धीरज जावळे, संजय मोती, जितेंद्र सोनवणे, पंकज वराडे, तुषार पाटील, प्रसन्न जाधव, इम्रान शेख व मुजीद काझी यांनी पंच म्हणून काम पाहिले. ममता सपकाळे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.