पंचायत समिती सभागृह भुसावळ येथे जि.प. जळगांव यांच्या शेष फंडातून आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथील पंचायत समितीच्या सभागृहात सन२०२२/२३ व २०२३/२४ या द्विवर्षीय आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण आयोजीत करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संजय सावकारे तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर तालुका कृषि अधिकारी अभिनव माळी, भालचंद्र पाटील, सदानंद उन्हाळे, मा. जि.प.सदस्य समाधान पवार, कृषि बाजार समितीचे सदस्य कैलास पाटील व सहा. गटविकास अधिकारी श्री एस डी पाटील उपस्थित होते. पुरस्कारार्थी शेतक-यांमध्ये बन्सीलाल भावलाल पाटील रा. शिंदी यांनी भाजीपाला उत्पादक शेतक-यांना माफक दरात रोपे विक्री करण्यासोबत लागवड व किड -रोग नियंत्रणाबाबत प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येते. तसेच 6 तालुक्यातील सर्व जि. प. शाळेत पोषण आहार अंतर्गत मोफत रोपे पुरविली होती.

त्याचप्रमाणे गावांतील सुशिक्षीत बेरोजगार विद्यार्थ्यांना श्री समर्थ कृपा नर्सरी च्या माध्यमातून स्पर्धा क्लासेसचे मोफत वर्ग चालवले जातात. तर दुसरे पुरस्कारार्थी शेतकरी पद्माकर अर्जुन बुंदे रा. कु-हे प्रन‌ ता. भुसावळ यांना रेशीम शेती, सेंद्रीय भाजीपाला उत्पादन, कृषि यांत्रिकीकरण व उत्कृष्ट सिताफळ उत्पादन यासाठी देण्यात आला.

आपले मनोगत व्यक्त करतांना बन्सीलाल पाटील यांनी पुरस्कार स्वरुपात मिळालेली रु.‌ 10,000/- बक्षिस रक्कम शिंदी गावांतील स्मशान भुमीसाठी भेट देण्याचे जाहीर केले. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना‌ आ.‌संजय सावकारे यांनी तरुण शेतक-यांनी नोकरीच्या मागे न पळता दोन्ही सत्कारमुर्ती तरूण शेतक-यांप्रमाणे आपल्या शेतीत नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल या दृष्टीने विचार करून व निर्यातक्षम बाजारभाव कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील बरेच शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद जाधव (तंत्र व्यवस्थापक आत्मा, कृषि विभाग) यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विभागाचे कपिल पाटील (कृषि अधिकारी पं. स. भुसावळ) व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला