मनोज जरांगेंना अटक करणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, संयमाचा अंत पाहू नका

मुंबई – देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप मराठ आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत.

याचपार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला की, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहेत, तर त्यांना अटक करणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, संयमाचा अंत पाहू नका. तसेच कायद्यापेक्षा कुणीही स्वत:ला मोठे समजू नये. त्यामुळे आता मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना अटक होणार का? हे वे लागेल.