ममुराबाद – 19 फेब्रुवारी- प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमाची रणधुरंधर क्षत्रिय कुलवंतस, सिंहासनाधीश्वर , महाराजधिराज महाराज श्रीमंत श्री योगीराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी ममुराबाद तालुका जळगाव येथे खंडेराव नगर मित्र मंडळ ममुराबाद यांच्यावतीने छत्रपती शिवरायांच्या जयंतीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
नुकत्याच ममुराबाद येथील दत्त चौका मध्ये भल्यामोठ्या अश्वावर रूढ अशा छत्रपंतीची स्थापना झाली.ज्यांना धर्माबद्दल आदर आणि आक्रमणापासून आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच “छत्रपतीं” किंवा “राजांचा राजा” ही पदवी मिळाली. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना सकाळी ९ वाजता पुष्पहार, दीप प्रज्वलन, पूजन, शिवरायांची आरती करण्यात आली. यावेळी शिवस्मारक समितीचे पदाधिकारी त्याच प्रमाणे गावातील नागरीक उपस्थीत होते.
तसेच ग्रामपंचायत कार्यालयात देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले यावेळी सरपंच हेमंत चौधरी, ग्रा वि अधिकारी कैलाश देसले, ग्रा पं सदस्य, ग्रा पं कर्मचारी, उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजेदरम्यान गावातील वार्ड क्रमांक ३ मधिल खंडेराव नगर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फलकाचे अनावरण सरपंच हेमंत चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.
व तेथुनच जयंतीला प्रारंभ झाला. शिवरायांवर अपार प्रेम असणारे ममुराबाद खंडेराव नगर येथील शिवभक्तांचे जयंती साजरी करण्याचे पाचवे वर्ष असून आजची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. यामध्ये मोठ्या संखेने महिला उपस्थीत होत्या. जयंती मिरवणुकी मध्ये शिवरायांची आरती करूण जयंतीला सुरुवात झाली.
शिवरायांची स्वयम शिस्त, जिजाऊंचे संस्कार, मावळ्यांप्रती असणारे प्रेम, समाजाला सन्मानानं जगवणे, अन्याय सहन न करणे, जातीभेद न मानने आधी विचारांची रुजवणूक खंडेराव नगर मित्र मंडळ मनापासून करत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शर्मा व त्यांचे सहकारी पोलीस वर्गाने या जयंती मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवला होता.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच अमर पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, भ्रष्ट्राचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे, जितेंद्र जंजाळे, चंद्रकांत पाटील, हेमंत पाटील,राजेंद्र लटकण पाटील, सुनिल वाघोडे, निंबा पाटील, किरण पाटील, निखील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इत्यादीनी या कार्यक्रमात परिश्रम घेतले.